मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते, अशी नायिका म्हणजे प्राजक्ता माळी.



आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे.



निसर्गात रमणारी प्राजक्ता माळी सतत कुठे ना कुठे भटकंतीसाठी जात असते. या ट्रिप्सचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.



नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ता सध्या लंडनमध्ये आहे.



लंडनच्या रस्तावर फिरस्ती झालेली प्राजक्ता लंडनमध्ये ‘लायन किंग’ बघण्याचा आनंद लुटत आहे.



चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तिने आपल्या लंडन सफरीची झलकही सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली आहे.



इथे प्राजक्ताला तिचे काही मित्र देखील भेटले आहेत. तिने अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, ऋषिकेश जोशी आणि अलोक राजवाडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.



एका चित्रपटाच्या निमित्ताने ही कलाकारांची टोळी सध्या लंडनमध्ये दाखल झाली आहे.