टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री निया शर्मा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या कामामुळे तसेच बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी निया शर्मा आज अर्थात 17 सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे.



मालिका विश्वापासून सुरु झालेला हा तिचा प्रवास आता रिअॅलिटी शोपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय सोशल मीडियावरही तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. मात्र, नियासाठी हा प्रवास इतका सोपा नव्हता.



1990 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या नियाचे खरे नाव नेहा आहे. अभिनेत्रीने तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले आहे.



तिने मीडिया स्टडीजमध्ये पदवी घेतली आणि तिला पत्रकार बनायचे होते, परंतु त्यानंतर तिने मॉडेलिंग आणि टीव्हीमध्ये प्रवेश केला.



आपल्या बोल्ड स्टाईलसाठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध असणाऱ्या निया शर्माने 2010मध्ये टीव्ही शो 'काली : एक अग्निपरीक्षा' मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.



यानंतर निया 'एक हजारों में मेरी बहना है' मध्ये झळकली आणि या मालिकेतील मानवीच्या भूमिकेतून तिने घराघरांत नाव कमावले.



या यशानंतर निया शर्माने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने ‘जमाई राजा’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.



यानंतर तिने ‘इश्क में मरजावा’ आणि ‘नागिन 4’ सारख्या सुपरहिट शोमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या.



याशिवाय निया ‘फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.



Thanks for Reading. UP NEXT

नऊवारी साजात रुपाली भोसले दिसतेय खास!

View next story