'पावनखिंड' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. 'पावनखिंड' सिनेमाने अजय पुरकर यांना नवी ओळख दिली आहे. अजय पुरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 'पावनखिंड' सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. कधी नायक तर कधी खलनायक म्हणून अजय पुरकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अजय पुरकर यांचे 'कोडमंत्र' नाटकदेखील प्रचंड गाजले होते. अनेक गाजलेल्या प्रोजेक्टचा अजय पुरकर भाग आहेत. अजय पुरकर यांनी अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.