प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे
प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे
अशातच या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत
राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला त्यांच्या आसनावर बसवण्यात आलं आहे
फक्त प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उरला असून 22 जानेवारी रोजी, देशातील प्रत्येकजण रामललाचा अभिषेक सर्वांनाच पाहता येणार आहे.
प्रभू रामांचा हा भव्य सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी अनेकजण अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
आता काही दिवस बाकी असून 22 जानेवारीला रामललाची विधीवत पूजा अर्चांसह अभिषेक करण्यात येणार आहे
अशातच या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारनं केंद्रीय कार्यालय आणि संस्थांना दुपारी अडीच वाजेपर्यंत 'हाफ डे' ची घोषणा केली आहे.
प्रभू श्रीरामाचं पहिलं रुप! रामललाच्या मूर्तीचे पहिले चित्र समोर आलं आहे