एका अभ्यासामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चहा प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी असतो.



चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होतं नाही



चहा, कॉफीच्या सेवनाचे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क आतापर्यंत समोर आले आहेत



आता चहा प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो, असा दावा करण्यात येतं आहे



एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, चहा प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो



अमेरिकेमधील एका संशोधनाच्या आधारे हा दावा करण्यात येत आहे



यूके बायोबँकच्या संशोधनात असं समोर आले आहे की, जे लोक दिवसातून दोन किंवा अधिक कप काळा चहा पितात त्यांना मृत्यूचा धोका कमी असतो



अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, काळा चहाऐवजी दूध किंवा साखर मिसळून चहा पिणाऱ्या व्यक्तींनाही काळा चहा पिणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच मृत्यूचा धोका कमी असतो. यामध्ये जास्त फरक आढळत नाही.



अमेरिकेतील या संशोधनानुसार, चहा न पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत चहा पिणाऱ्या व्यक्तींना मृत्यूचा धोका कमी असतो



या अभ्यासानुसार, चहा पिणाऱ्या आणि चहा न पिणाऱ्या लोकांची तुलना केल्यास, जे लोक दररोज दोन किंवा अधिक कप चहा पितात त्यांना मृत्यूचा धोका 9 टक्के ते 13 टक्के असतो. तर चहा न पिणाऱ्या व्यक्तींमध्ये हा धोका वाढतो, असे संशोधकांनी सांगितले.