केस गळती सुरु आहे किंवा केस रुक्ष झाले आहेत, तर या आयुर्वेदिक उपायांनी केसांसंबंधित समस्या दूर होतील
केसांसाठी तुम्ही केमिकलयुक्त प्रोडक्टसपेक्षा आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केल्यास अधिक फायदा होईल
केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर शिकाकाई, रीठा आणि आवळा फायदेशीर ठरू शकतात
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, हे केस गळती रोखण्यात प्रभावी आहे, तर रीठा लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे केसांची वाढ होते.
केसांसंबंधित समस्यांवर उत्तम आयुर्वेदिक उपाय म्हणजे भृंगराज. याचा वापर केल्याने केस गळतीच्या त्रासापासून सुटका होईल. आयुर्वेदामध्ये भृंगराजचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे.
भृंगराज केसांना योग्य पोषण देत त्यांना अधिक मजबूत करते. शिवाय केसांची वाढ होण्यास मदत करते.