थिएटरमध्ये शाहरूख खानच्या पठाणचा जलवा आहे. पण सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा हेगडेचा जलवा दिसत आहे. एका चाहत्याने सलमान आणि पूजा हेगडेच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर ट्विटरवर शेअर केला आहे. टीझरमध्ये सलमान चर्चेत आहे. परंतु, यातील पूजा देखील अनेकांच लक्ष्य वेधून घेत आहे. या चित्रपटातील पूजा हेगडेची स्टाईलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टीझरमध्ये पूजा आणि सलमानची जोडी खूपच छान दिसत आहे. टीझर अॅक्शनने भरलेला असून सलमानच्या चाहत्यांसाठी हा ट्रीटपेक्षा कमी नाही. सलमानचा हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि पूजाची जोडी चाहत्यांना खूपच आवडली आहे. खास म्हणजे टीझलमध्ये पूजा खूप कमी वेळ दिसत आहे. पूजाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.