गेल्या 30 वर्षांपासून शाहरुख खान प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही त्याची क्रेझ कायम आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'पठाण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवशी पठाण हा सिनेमा 50 कोटींचा टप्पा पार करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे.

'पठाण' सिनेमात शाहरुख खान रॉ एजंटच्या भूमिकेत आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 24 कोटींपेक्षा अधिक कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.

शाहरुखसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे.

'पठाण'नंतर शाहरुखचे 'डंकी' आणि 'जवान' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.