आज 'राष्ट्रीय पर्यटन दिनी' सई ताम्हणकरने मोठी घोषणा केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री आता जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे.

सईची 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' या वेबसीरिजमध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते पुणे आणि नाशिकच्या दिव्य मंदिरांपर्यंतच्या ठिकाणांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील तोंडाला पाणी सुटणारे खाद्यपदार्थ आणि शॉपिंग ठिकाणांचा शोध घेताना सई दिसणार आहे.

सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

सईचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.

मराठी मालिका आणि सिनेमांसह सईने वेबसीरिजमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

सई ताम्हणकर सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा सई प्रयत्न करत असते.