पंचागानुसार, दरवर्षी श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, यावर्षी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल.
श्राद्धाच्या 16 दिवसांत पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध विधी पितरांसाठी केले जातात. असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.
श्राद्धाच्या वेळी प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी अन्नाचा काही भाग काढला जातो. अन्नाचा काही भाग काढल्याशिवाय श्राद्ध विधी अपूर्ण मानले जातात.
पितरांसाठी काढलेल्या अन्नाच्या या पाच भागांना पंचबली म्हणतात. जाणून घेऊया पितृपक्षामध्ये कोणत्या प्राण्यांसाठी अन्नाचे 5 भाग घेतले जातात.
पितृ पक्षामध्ये पाच वेगवेगळ्या भागात अन्न बाहेर काढले जाते. गाय, कुत्रा, मुंग्या आणि देवांसाठी पानांवर अन्न काढले जाते आणि कावळ्यांसाठी काही भाग जमिनीवर ठेवला जातो.
पितृ पक्षाच्या काळात पितरांसाठी श्राद्ध विधी केले जातात. ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज प्राणी आणि पक्ष्यांच्या माध्यमातून आपल्याकडे येतात.
पूर्वज गायी, कुत्रे, कावळे आणि मुंग्यांद्वारे अन्न मिळवतात. त्यामुळे श्राद्ध विधीत पितरांसाठी अन्नाचा काही भाग काढला जातो, तरच श्राद्ध विधी पूर्ण होतो.
श्राद्ध करताना कुत्रा हे जल तत्वाचे प्रतिक, मुंगी हे अग्नि तत्वाचे प्रतिक, कावळा हे वायु तत्वाचे प्रतिक, गाय हे पृथ्वी तत्वाचे तर देवता हे आकाश तत्वाचे प्रतिक मानले गेले आहे.
अशाप्रकारे, जेव्हा आपण या पाच घटकांसाठी अन्नाचा काही भाग काढतो, तेव्हा आपण पाच घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)