भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले आहेत. आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. त्यानुसार, आज 17 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड तेल आणि डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय (WTI) कच्च्या तेलाची किंमत शुक्रवारी 0.50 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 78.10 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये (Brent Crude Oil) 0.48 टक्क्यांची घसरण झाली असून त्याची किंमत प्रति बॅरल 84.73 डॉलरवर आहे. पण कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. सुमारे आठ महिन्यांपासून इंधन दर कायम आहेत. देशात 22 मे 2022 पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर