भारतीय नौदलाची 'सायलेंट किलर शार्क' म्हणजे, 'INS वागीर'. 'INS वागीर' प्रोजेक्ट 75 अंतर्गत फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानी सज्ज 'आयएनएस वागीर' आज (सोमवारी) नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार शत्रूंना धडकी भरवणारी 'INS वागीर' कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड स्वदेशी कंपनीनं INS वागीरची निर्मिती केली आहे. INS वागीर ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते, तर स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. वागीरचा शोध घेणं शत्रूसाठी जवळपास अशक्यच. तर, वागीर जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. INS वागीर शत्रूला चकवा देण्यात आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूच्या मनात शंका येण्यापूर्वीच ही पाणबुडी हल्ला करते. वागीर पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे. ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करू शकते. 'आयएनएस वागीर' पाणबुडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यात. अखेर आज वागीर भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.