आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झालीये. WTI क्रूड 1.41 डॉलरनं वाढून प्रति बॅरल 73.15 डॉलरवर व्यापार करतंय. ब्रेंट क्रूड 1.48 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 77.61 डॉलरवर विकलं जातंय. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.