एलपीजी गॅसच्या किमतींत मोठी घट झाली आहे.

एलपीजी विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत.

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत 83.5 रुपयांची कपात झाली आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

आजपासून दरांत घट झाल्यामुळे आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत.

दरांत घट होण्यापूर्वी व्यावसायिक सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.

मुंबईत व्यावसायिक गॅस 83.50 रुपयांनी स्वस्त झाला असून 1808.50 रुपयांवरून 1725 रुपयांवर येऊन पोहोचला आहे.

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1856.50 रुपयांवरून 83.50 रुपयांनी कमी होऊन 1773 रुपयांनी विकला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

यापूर्वी मार्चमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतींत बदल करण्यात आला होता.