आजपासून नवा महिना सुरू होत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत 83.5 रुपयांची कपात झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीम सुरू केलीये. RBI नं बँकांना किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिलेत. याद्वारे आरबीआय इनअॅक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतंय 1 जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटर्स महागणार आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर्सवरील अनुदान कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं भारतातून निर्यात केलेल्या सर्व खोकल्याच्या सिरपची अनिवार्यपणे चाचणी करण्याचे निर्देश दिलेत औषधं निर्यात करण्यापूर्वी निर्यातदारांना औषधाची शासकीय प्रयोगशाळेत चाचणी करून चाचणी अहवाल दाखवावा लागेल