आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आज स्थिर आहेत. काही काळापासून, कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होतेय. ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 86.24 डॉलरवर व्यापार करतंय. WTI क्रूड ऑईल प्रति बॅरल प्रति बॅरल 82.82 डॉलरनं विकलं जातंय. देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल झाल्याचं पाहाला मिळतंय. देशातील महानगरांत मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर आज जैसे थेच आहेत. राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.