देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केलेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर सुधारित केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. भारतात सर्वात महाग पेट्रोल-डिझेलच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीये. महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 109.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.66 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिरच आहेत.