चवीला तुरट असणाऱ्या आवळ्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. जसे की, चटणी, लोणचं, मुरांबा, कॅंडी इ.

आवळा डोळ्यांसाठी तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आवळ्याचे सेवन करू नये. कारण यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. जे किडनीच्या आरोग्यासाठी घातक आहे.

सामान्य सर्दीमध्येही आवळ्याचे सेवन करू नये. कारण त्याचा प्रभाव थंड असतो.

दृष्टी वाढवण्यासाठी तसेच केस गळती थांबविण्यासाठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आवळ्याचे सेवन करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

आवळ्याचा उपयोग युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठीही केला जातो, यामुळे लघवीचे प्रमाणही नियंत्रित राहते. त्याचबरोबर आवळा अपचनाच्या समस्येपासूनही आराम देतो.