बॉलिवूडचा बदशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान हा सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. चित्रपटामधील डायलॉग्सला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पठाण चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पठाण चित्रपटाच्या कलेक्शनची माहिती दिली. रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार, पठाणनं सहाव्या दिवशी भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. लवकरच हा चित्रपट भारतात 300 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे. पठाण या चित्रपटानं सहा दिवसांमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.