एकादशीचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज पापमोचनी एकादशी निमित्ताने वारकरी उपवास ठेवतात. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी महत्त्वाची मानली जाते. ही एकादशी पापमोचिनी एकादशी नावाने ओळखली जाते. यानिमित्तानं वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली पुण्यातील आळंदी आणि देहू नगरी सजून गेली संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज्यांच्या मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. देशी विदेशी फुलांचा मिलाफ करून ही सजावट करण्यात आली. फुलांची ही सजावट भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.