गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने विठुराया आणि भक्तांचे अंतर संपवले आहे. कोरोनामुळं गेल्या काही काळापासून बंद असलेलं थेट दर्शन आजपासून सुरु होतंय. भाविक आता थेट विठुरायाच्या चरणाचं दर्शन मिळणार आहे. या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच फुलांची उधळण करत विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात आलं आहे. आज गुढी पाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात पुणे येथील विठ्ठल भक्त नाना मोरे आणि नवनाथ मोरे यांनी फुलांची व फळांची आकर्षक सजावट सेवा दिली आहे. आज गुढी पाडव्याला या प्रसन्न वातावरणात भाविकांना विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवण्याचा आनंद घेता येत आहे. देशात कोरोनाचे संकट सुरु झाले आणि 17 मार्च 2020 पासून विठ्ठल मंदिर बंद झाले होते . यानंतर मंदिर खुले झाले तरी निर्बंधामुळे विठुरायाचे दुरून दर्शन घ्यावे लागत होते .