ओमायक्रॉन संसर्गाचे सावट आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यात जमाव बंदी व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

आता शिर्डीतील साई संस्थानानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रशासनानेही दर्शनाच्या वेळेवर बंधने आणली आहेत.

रात्री 9 वाजता विठूरायाचे मंदीर भाविकांसाठी बंद होणार आहेत.

मंदीर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारने घेतलेल्या जमाव बंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या पंढरपूरमध्ये नाताळाच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदीर प्रशासनाने जमाव बंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे भाविकांना विठूरायाच्या दर्शनासाठी रात्री 9 वाजण्याच्या आधीच मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे.