भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आजपासून सुरुवात कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना म्हणून ओळखला जाणार आहे. सेंच्युरियनवर हा सामना होणार आहे. मागील 29 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टीम इंडियाला कसोटी मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इतिहास रचणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसानंतर फलंदाजी करणे सोपं होईल असे म्हटले जात आहे. खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना चांगली मदत होईल. फिरकीपटूंना सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. (Photo:@BCCI/Twitter)