पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे.



वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं.



या अर्धशतकासह त्यानं एका खास विक्रमाला गवसणी घातलीय.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग नऊ सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरलाय.



तसेच या सामन्यात त्यानं विराट कोहलीचा एक खास विक्रमही मोडला आहे.



ज्यामुळं सोशल मीडियावर विराट आणि बाबर यांची एकमेकांशी तुलना केली जात आहे.



पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाची कमान हाती घेतल्यानंतर बाबरने 13 डावांत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत.



भारतीच संघाचा कर्णधार असताना एक हजार धावा करण्यासाठी विराट कोहलीला 17 डाव लागले.



बाबर आझमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकावणारा दुसरा खेळाडू बनण्याची संधी होती. मात्र, त्याच्याकडून ही संधी हुकली.



एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठ खेळाडूंनी सलग तीन शतके झळकावली आहेत. यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.



Thanks for Reading. UP NEXT

आयएनएस विक्रांतची भन्नाट प्रतिकृती, राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

View next story