राज्यात जलसंवर्धनासाठी मोठं काम करत असलेल्या पानी फाऊंडेशनचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे.
अमेरिकेतील ओरेगॉन युनिव्हर्सिटीमधील सुप्रसिद्ध पर्माकल्चर प्रशिक्षक अँड्र्यू मिलिसन यांनी यासंदर्भात एक महत्वाचं संकलन केले आहे.
यात त्यांनी पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या भारतातील 5 महत्वाच्या उपक्रमांची दखल घेतली आहे.
यात पानी फाउंडेशनचे कार्य प्रथम क्रमांकाचं असल्याचे नमूद केले आहे.
नुकतंच पर्माकल्चर प्रशिक्षक अँड्र्यू मिलिसन यांनी पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या जगातील 5 सर्वात प्रभावी प्रकल्पांबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ टाकला आहे. यात त्यांनी Arvari River Restoration, The Chikukwa Project, GRAVIS Jodhpur, The Loess Plateau, The Paani Foundation या प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे.
वॉटर हार्वेस्टिंगसाठी पानी फाऊंडेशननं केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे.
या प्रकल्पांमुळं महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाणी पातळीत वाढ झाली आहे. 45 दिवसांच्या या स्पर्धेनं पावसाळ्यातलं पाणी जागेवर मुरलं जात आहे.
यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत असून उत्पादनात वाढ होत आहे. जगासमोर हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे. यामुळं हा प्रकल्प नंबर एक असल्याचं अँड्र्यू मिलिसन यांनी म्हटलं आहे.