भारतात प्राण्यांशी संबंधित अनेक म्हणी आहेत. गाढवाला गुळाची चव काय अशा अनेक म्हणी आहेत. त्यातच घुबडाशी संबंधित देखील अनेक म्हणी प्रसिद्ध आहेत. खरतर घुबडाला हिंदीमध्ये उल्लू म्हटलं जातं त्यामुळे एखाद्याला बावळट संबोधताना घुबडाची उपमा दिली जाते. पण खरचं घुबड स्वत: बावळट असतं का? घुबड हे ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतं असं मानलं जातं. पण या गोष्टीचं कोणतंही वैज्ञानिक स्पष्टीकरण अजूनही आलेलं नाही, की घुबड खरचं हुशार असतात. तथापि, घुबड हे अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की घुबड हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात. तसेच घुबड त्यांची शिकार देखील अत्यंत हुशारीने करतात.