बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंनिसतर्फे करण्यात आली.
त्यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदनदेखील दिलं आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धिरेंद्र शास्त्री सतत करत असून
असा आरोप महाराष्ट्र अंनिसने केला आहे. महाराष्ट्र अंनिसने मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे.
वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रीपुढे नतमस्तक झाले.
त्यांनी अ दरबारात जाणे कायद्यांचा भंग करणारे आहे.
त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन
लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, बाबी सांगत आहेत,
अशी अंनिसची मागणी