'ओपेनहाइमर'या हॉलिवूड सिनेमाचीकाही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. 2023 च्या बहुचर्चित हॉलिवूड सिनेमांत 'ओपेनहाइमर' या सिनेमाचा समावेश आहे. क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे या सिनेमात हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फी मुख्य भूमिकेत आहे. आता या सिनेमासाठी सिलियनने भगवद्गीतेचे पठण केल्याचं समोर आलं आहे. सिलियन मर्फी सध्या त्याच्या आगामी 'ओपेनहाइमर'या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. आता सुचारिता त्यागीला दिलेल्या मुलाखतीत सिलियनने 'ओपेनहाइमर' सिनेमासाठी भगवद्गीतेचे पठण केल्याचं सांगितलं आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला आता आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत आहे. सिलियन मर्फी 'ओपेनहाइमर' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.