आपल्या देखण्या आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाले आहे.
अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.
रविंद्र महाजनी यांनी 'जाणता अ जाणता' या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांची पहिलीच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
रविंद्र महाजनी यांचं 'तो राजहंस एक' हे प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. शांतारामबापूंनी या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि आपल्या सिनेमासाठी त्यांना विचारणा केली.
'झुंड' असे या सिनेमाचं नाव. 1974 मध्ये आलेल्या या सिनेमाने रविंद्र महाजनी यांना सुपरस्टार केलं.
'पानिपत' या सिनेमातही रविंद्र महाजनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं',' देवता', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार', असे रविंद्र महाजनी यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत.
'सत्तेसाठी काहीही' या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा रविंद्र महाजनी यांनी सांभाळली आहे.
सत्तरच्या दशकातला 'चॉकलेट बॉय' म्हणून रविंद्र महाजनी ओळखले जायचे.
हँडसम फौजदार अभिनेता आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोद खन्ना अशी रविंद्र महाजनी यांची ओळख आहे.