टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. टोमॅटोनंतर आता कांद्याच्या भावातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच रेटिंग एजन्सी क्रिसिल (CRISIL) च्या अहवालानुसार, या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात कांदा 35 ते 40 रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पाऊस आणि पुराचा परिणाम आता कांद्यावरही होऊ लागला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठ्यात ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळेच येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत. सध्या कांदा 30 रुपये किलोने बाजारात विकला जातोय.