न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन आता इंग्लंड क्रिकेट संघाचा कोच होणार आहे.



इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबत अधिकृत माहिती दिली.



आयपीएलच्या केकेआर संघाचं प्रशिक्षकपद सोडून ब्रेंडन इंग्लंडचा कोच होईल.



दरम्यान ब्रेंडन कोच म्हणून कशी कामगिरी करेल, तसंच त्याचा पगार किती याचा अनेक क्रिकेट प्रेमींना प्रश्न पडला आहे. समोर



आलेल्या माहितीनुसार ब्रेंडनला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून तब्बल 1 मिलियन डॉलर इतका पगार मिळणार आहे.



भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास साडेसात कोटीच्या घरात आहे.



विशेष म्हणजे केकेआरचा कोच असताना ब्रेंडनला मिळणाऱ्या पगाराच्या ही किंमत दुप्पट आहे.



त्यामुळे आता केकेआर संघालाही पुढील हंगामासाठी नवा कोच शोधावा लागणार आहे.



इंग्लंड संघाला यशस्वी करणे हेच माझे लक्ष्य असेल, असे मॅक्युलम म्हणाला.



मॅक्युलम आल्यानंतर इंग्लंड संघाची कामगिरी आणखी सुधारेल का हे पाहावे लागेल.