महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्तापालटली असून राज्य सरकारची समिकरणं पुन्हा बदलली आहेत. ( Photo Credit : PTI)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यापालांकडे सुपूर्द केला आहे. ( Photo Credit : PTI)
तसेच भाजप (BJP) आणि जेडीयूच्या सरकारचा आजच शपथविधी होणार आहे. ( Photo Credit : PTI)
बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. पण या महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्याकडून घेण्यात आला आहे. ( Photo Credit : PTI)
नितीश कुमार यांच्यसह भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. ( Photo Credit : PTI)
सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. ( Photo Credit : PTI)
तसेच आता नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासह 9 मंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. ( Photo Credit : PTI)
त्यामुळे आता बिहारमधील राजकीय घडामोडींना बराच वेग आलाय. ( Photo Credit : PTI)
याचसाठी बिहारचे प्रभारी विनोद तावडे देखील पोहचले होते. ( Photo Credit : PTI)
आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील बिहारमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आलीये. ( Photo Credit : PTI)