महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सपाचे आमदार अबू आझमींच निलंबन करण्यात आलं आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता.
सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली होती.
याचदरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं.
या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचं जाहीर करत अबू आझमींचं निलंबनावर शिक्कामोर्तब केलं आहे.
अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेतही पडले.
उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानपरिषदेत भाषण केले.
पक्षातून अबू आझमीची हकालपट्टी करा अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केली.
अबू आझमीच्या वक्तव्यावर समाजवादी पार्टीने स्पष्टीकरण द्यावे आणि भारताचा वारसा, गौरव आणि सम्मान राखावा असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
'अबू आजमी को यूपी भेज दो, इलाज कर देंगे' असंही वक्तव्य योगी आदित्यनाथांनी केले आहे.