उत्तराखंडयेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले केदारनाथ धामचे कपाट आजपासून भाविकांसाठी उघडण्यात आले आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

आज सकाळी मंत्रोच्चार, पूजा-अर्चनासह आणि विधीवत पूजेसह कपाट उघडण्यात आले.

Image Source: PTI

पुढील सहा महिन्यांपर्यंत भाविक भगवान केदारनाथांचे दर्शन घेऊ शकतात.

Image Source: PTI

यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि देखील करण्यात आली होती.

Image Source: PTI

आर्मी बँडने मधुर धून वाजविल्या यावेळी संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला.

Image Source: PTI

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केदारनाथचे रावल भीमाशंकर लिंग, प्रमुख पुजारी वागेश लिंग आणि असंख्य भाविक या वेळी उपस्थित होते.

Image Source: PTI

अक्षय तृतीयेला यमुनोत्री धामचे कपाट आणि त्यानंतर गंगोत्री धामचे कपाट उघडण्यात आले.

Image Source: PTI

आता 4 मे रोजी बद्रीनाथ धामचे कपाट उघडले जातील.

Image Source: PTI

धार्मिक मान्यतेनुसार, चारधाम यात्रा यमुनोत्रीपासून सुरू केल्यास ती निर्विघ्न होते. केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा 2 मेपासून सुरू झाली आहे.

Image Source: PTI