शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माणसाला अधिक मोह असू नये, कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे विधानसभेची निवडणूक दीड वर्षांवर आली आहे. तर चारच महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके कोणते आणि किती खोलवर बदल होतात ते आता पाहावं लागेल. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. आपापल्या जागेवर बसण्याचं आवाहन केलं.