महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्षा या शासकिय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री सकाळी हुतात्मा चौकात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांनी बलिदान दिलं त्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादनं केलं. आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे.