बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर नयनतारा आणि विग्नेशने 9 जून रोजी लग्न केले.



आता नयनतारा आणि विघ्नेशच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



या जोडीचे हे फोटो नयनताराने तिच्या इन्स्टा हँडलवरून शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले दिसत आहेत.



अभिनेत्री फिकट गुलाबी रंगाच्या साडीत, तर विग्नेशने मॅचिंग शर्ट आणि काळी पँट घातली आहे.



नयनतारा आणि विग्नेश शिवनचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते.



आता नेटफ्लिक्स या दोघांची ही प्रेमकहाणी डॉक्युमेंट्रीच्या रूपात साकारणार आहे.



त्यांचा विवाह OTT प्लॅटफॉर्म Netflix वर डॉक्युमेंटरी म्हणून प्रदर्शित केला जाईल.



या माहितीपटाचे दिग्दर्शन गौतम वासुदेव मेनन करणार आहेत.



तर राउडी पिक्चर्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती होणार आहे.