'मॉम टू बी' आलिया भट्ट सध्या तिच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया ब्रह्मास्त्र या चित्रपटाचं सध्या प्रमोशन करत आहे. नुकतेच आलियानं तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले. ब्लू डेनिम पँट,शर्ट आणि कानात गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले. आलियाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. रेड कलरचा वन पिस आणि गोल्डन कानातले अशा लूकमधील फोटो देखील आलियानं शेअर केले. आलिया सध्या तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आलियाच्या डार्लिंग्स या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आलियाचा 9 सप्टेंबर रोजी 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट रिलीज झाला होता. 'ब्रह्मास्त्र' मधील काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.