उन्हाळा सुरू झाला शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन झालेला आहे या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पळसाची फुलं सुद्धा बहरली आहेत
या पळसाच्या फुलांचा होळीच्या सनात नैसर्गिक रंग बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो गडद केशरी रंगाच्या पळसाच्या फुलांचे नयनरम्य दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
या लाल केशरी रंगाच्या पळासाच्या फुलांनी हिंगोली जिल्ह्यातील निसर्ग अधिकच खुलून दिसत आहे.
भारतीय सन उत्सव हे निसर्गावर अवलंबून आहेत निसर्ग आपल्याला येणाऱ्या सनांची चाहूल देऊ लागतो. आशाच पध्द्तीने होळीच्या सणाची चाहूल फुलांनी बहरलेला पळस देऊ लागला आहे.
पळसाच्या फुलाचे हे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यात भुरळ पडत आहे
निसर्ग सुध्धा ह्या फुलांनी अधिकच खुलून दिसू लागला आहे.
उन्हाळ्यात जेंव्हा सर्व डोंगर माळरान ओसाड दिसते तेंव्हा फुलून दिसतो तो म्हणजे पळस.
अत्यंत कठीण परिस्थितीत ही आपण कशा पद्धतीने बहारावे यासाठी नेहमीच पळसाचे उदाहरण आपण देत असतो ज्योत ज्या पद्धतीने पेटावी त्या पद्धतीने डोंगरांमध्ये हा गडद केशरी रंगाचा पळस फुललेला दिसतोय.
आयुर्वेदातही या पळसाचं मोठं महत्त्व आहे होळी सणाच्या काळात नैसर्गिक रंगासाठी या पळसाच्या फुलाचा वापर केला जातो.