सुंदर त्वचा सर्वांनाच हवी असते.

सुंदर दिसण्यासाठी लोक अनेक महागड्या क्रीम वापरतात.

पण, केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती आयुर्वेद उपचार करू शकतात.

जाणून घ्या कोणते आहेत हे घरगुती उपाय.

मुलतानी मातीचा नेहमीच नॅचरल ब्युटी प्रोडक्टमध्ये वापर केला जातो.

त्वचेशी संबंधी सर्व समस्यांवर मुलतानी माती फायदेशीर ठरते.

मुलतानी मातीमध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्मांसह खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे.

यातील अ‍ॅसिडिक घटक त्वचेतील पीएच लेव्हल संतुलित ठेवण्याचे कार्य करते.

मुलतानी माती नैसर्गिक स्वरुपात आपल्या त्वचेला थंडावा देण्याचे कार्य करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.