नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) यांचा झुंड (Jhund) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका केलीय बिग बींसह अनेक नवखे कलाकार या सिनेमात झळकले. अनेक कलाकारांना यातून नवी ओळख मिळाली. यांपैकीच एक म्हणजे भावना भाभीचा रोल केलेली सायली पाटील सायली पाटीलला झुंडनंतर एक वेगळी ओळख मिळाली आहे तिनं झुंडमधील अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत सायलीनं सैराट सिनेमासाठी देखील ऑडिशन दिली होती. पण त्यावेळी तिची निवड झाली नाही. झुंडसाठी तिला नागराज मंजुळेंनी फोन केला तेव्हा तिला विश्वासच बसत नव्हता. ती सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असते