दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात फलंदाजीदरम्यान भारताची सलामीवीर स्मृती मांधनाच्या डोक्यावर चेंडू आदळला. मात्र, आता तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीनं दिलीय. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने टाकलेला बाऊन्सर स्मृतीच्या हेल्मेटला लागला. स्मृती मांधनाचं अनफीट असणं भारतासाठी मोठा धक्का असू शकतो. आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने टाकलेला बाऊन्सर स्मृतीच्या हेल्मेटला लागला होता. या विश्वचषकात ती महत्वाची भूमिका बजावेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.