रणवीर 83 या चित्रपटामध्ये क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.



काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून अनेकांनी रणवीरच्या अभिनयाचे कौतुक केले.



कपिल यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली.



एका मुलाखतीमध्ये रणवीरने सांगितले की, कपिल देव यांची भूमिका साकारणं त्याच्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होतं.



रणवीरने त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. 6 महिने त्याने तयारी केली.



रणवीर दिवसातील 4 तास मैदानावर क्रिकेटची प्रॅक्टिस करत होता.



सिंम्बा चित्रपटासाठी रणवीरने वजन वाढवले होते. त्यामुळे 83 चित्रपटासाठी त्याला वजन कमी करावे लागले. दररोज 2 तास तो जिममध्ये वर्कआऊट करत होता.



एका रिपोर्टनुसार, चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर काही दिवस कपिल देव यांच्या घरी जाऊन त्यांचे बारकाईने निरीक्षण करत होता.



चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत