तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन आज एक वर्षांचं झालं.
मोदी सरकारनं देशात तीन नव्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी केली अन् देशभरातील शेतकऱ्यांनी या कायद्यांविरोधात एल्गार पुकारला.
सुरुवातीला पंजाब आणि हरियाणातील शेतकरी संघटनांनी 'दिल्ली चलो' आंदोलनाची हाक दिली होती. पण पाहाता पाहता संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
अन् पाहता पाहता हे आंदोलन केवळ देशभरातच नाही, तर जगभरात पोहोचलं.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. अनेक हॉलिवूड कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
देशातही या आंदोलनामुळं अनेक घटना घडल्या. अखेर बळीराजासमोर सरकार झुकलं अन् पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली.
पण जोपर्यंत कायदे घटनात्मक पद्धतीनं रद्द होत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचा स्पष्ट मत शेतकऱ्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही कृषी कायदे मागे घेण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावर शिक्कामोर्तब झाला.