यंदा 29 जूनला देशभरात मुस्लिम समाजाकडून बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे.
मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात
ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे
रमजान ईद झाल्यावर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते.
मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे
ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे
बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात
ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात.
याच सणाला ईद-उल-जुहा म्हणतात ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे
स्लिम बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व समजले जाते.