तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सध्या त्यामधील कलाकारांमुळे चर्चेत आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा सुरू होती. आता लवकरच मुनमुन दत्ता देखील ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा ' या मालिकेमध्ये बबिता ही भूमिका मुनमुन साकारते. बबिता या भूमिकेमुळे मुनमुनला विशेष लोकप्रियता मिळाली. पण रिपोर्टनुसार, मुनमुन ही मालिका लवकरच सोडणार आहे. रिपोर्टनुसार, मुनमुनला बिग बॉसच्या नव्या सिझनची ऑफर देण्यात आली आहे. मुनमुननं बिग बॉस या कार्यक्रमाची ऑफिर स्विकारली तर ती तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडायचा निर्णय घेऊ शकते. मुनमुननं अजून याबाबत कोणतीही माहिती तिच्या चाहत्यांना दिलेली नाही. मुनमुन दत्ता ही बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती.