औरंगाबादमध्ये महानगरपालिकेच्या सीटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.



दुपारी एक वाजेच्या सुमारास धावत्या बसला लागली अचानक आग.



अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.



आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.



औरंगाबादच्या करमाडजवळ ही घटना घडली आहे.



सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.



घटनास्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देत पाहणी केली.