प्रस्तावित भाडेतक्त्यामध्ये 5,10,15,20, 25,30,35,40,45 व 50 कि.मी. व त्यानंतर प्रत्येक 5 कि.मी. अंतरावर भाडेटप्पा
5 कि.मी. अंतरापर्यतचे किमान प्रवासभाडे 5 रुपयावरुन 10 रुपये करण्यात आले आहे.
5 कि.मी. अंतरापर्यंतचे किमान प्रवासभाडे 6 रुपयावरुन 12 रुपये करण्यात आले आहे.
नवीन सुसूत्रीकरणादरम्यान 5 ते 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना प्रवासभाड्यात सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
दैनंदिन बसपासचे शुल्क रु.60/- वरून रु.75/- करण्यात आलेले आहे. व मासिक शुल्क रु.900/- वरुन रु.1800/- करण्यात आलेले आहे.
खासगी शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ यामधून शिक्षण घेणाऱ्या वयोमर्यादा 26 वर्षाखालील विद्यार्थ्यांना विद्यमान सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रमाच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा
प्रवासी त्यांनी निश्चित केलेल्या अंतरादरम्यान ठराविक बसफेऱ्यांसाठी साप्ताहिक आणि मासिक पासचा वापर करुन प्रवास करू शकतात.