मुंबई सह राज्याला पावसानं झोडपलं आहे.

हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून आज, बुधवारी पावसाचा जोर वाढवला आहे.

मुंबईत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.

मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस पावसाचा जोर अजूनही वाढणार आहे.

Thanks for Reading. UP NEXT

दीप अमावस्या निमित्त शेकडो विद्यार्थ्यांनी केलं दिव्यांचं पूजन...

View next story