क्षेत्रफळानुसार भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.

आजच्या घडीला देखील भारतातील 70 टक्के लोकसंख्या ही खेडेगावांमध्ये राहते.

2011 पर्यंत भारतातील जवळपास 27 राज्यांमध्ये लोकसंख्या ही एक कोटीपेक्षा जास्त होती.

तर देशातील या 27 राज्यांमध्ये जवळपास 44 टक्के लोकसंख्या ही शहरी भागातली होती.

क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात अनेक मोठी शहरं आहेत.

लोकसंख्येनुसार मुंबई हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आहे.

अनेक स्वप्न मुंबई पूर्ण करते असं म्हटलं जातं.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईचं एकूण क्षेत्रफळ हे 603.4 चौरस किलोमीटर आहे.

मुंबईची आराध्य दैवत असलेली मुंबादेवीवरुन या शहराचं मुंबई असं पडलं आहे.

मुंबईत मराठी आणि हिंदी ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.